व्हिएतनाम की गोवा, या दोन ठिकाणांपैकी तुम्ही कोणत्या ठिकाणी जायचं यासाठी गोंधळात पडला आहात?
प्रवास वेळेविषयीच सांगावं, तर गोवा हा एक उत्तम पर्याय आहे.
प्रवासाच्या सोप्या पर्यायानं तुम्ही गोवा गाठू शकता. पण, व्हिएतनामला जाण्यासाठी मात्र खर्च तुलनेनं जास्त येतो.
बऱ्याचदा गोव्याला पर्यटनाचा हंगाम असला, तर मात्र विमानानं इथं पोहोचण्याच्या तुलनेत व्हिएतनामचंही तिकीट सहज परवडतं.
राहण्याच्या सोयीविषयी सांगावं तर गोवा आणि व्हिएतनाम अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही समुद्रासमोर राहण्याचा पर्याय निवडू शकता.
गोव्यात अशा सी फेसिंग हॉटेल रुमसाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागते. पण, व्हिएतनाममध्ये मात्र तुम्हाला सी फेसिंग रुम कमी दरात उपलब्ध असतात.
गोव्यामध्ये स्थानिक भटकंतीसाठी स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत. व्हिएतनाममध्येही हे पर्याय असले तरीही इथं बहुतांशी प्रवास महागातच पडतो.