पोटाचे आजार दूर होतात

पोटाचे कोणतेही विकार झाल्यास तांबाच्या भांड्यातील पाणी प्यावे. पोटदुखी,गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्टताही दूर होते. यकृत आणि मूत्रपिंड निरोगी राहण्यास मदत होते. अतिसार, जळजळ असे रोग निर्माण करणारे जीवाणू तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यानं नष्ट होतात.

Mar 29,2023

संधिवातासाठी उपयोगी

तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असल्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळं शरीरातील युरिक अॅसिड कमी होते. त्यामुळं संधिवाताची समस्या दूर होते.

त्वचाविकार दूर होतात

दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर फोड्या, तारुण्यपीटिका वा सुरकुत्या पडत नाहीत. त्यामुळं सैांदर्य टिकण्यास मदत होते.

वजन नियंत्रित राहते

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल व अ‍ॅन्टीवायरल असल्याने जखम भरण्यास मदत होते.

अनेक फायदे

सर्दी, खोकल्याचा सततचा त्रास असलेल्यांसाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी फायदेशीर ठरेल. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट्स मुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. रोज सकाळी पाणी प्यायल्यानं पूर्ण दिवस शरीरात ऊर्जा राहते.

VIEW ALL

Read Next Story