कोथिंबीर 2 दिवसात सुकून खराब होते?, ही ट्रिक बेस्ट

Jun 22,2023

कोथिंबीर आठवडाभर टिकेल

Store Fresh Coriander : घरी आणलेली कोथिंबीर दोन दिवसात सुकून खराब होत असेल तर या काही सोप्या ट्रिक्स वापरा आणि कोथिंबीर एकदम फ्रेश राहील. हिरवीगार कोथिंबीर आठवडाभर टिकून राहील.

कोथिंबीर फ्रेश राहील

कोथिंबीर घरी आणल्यानंतर कोथिंबीरीची मुळं पाण्यात बुडवून ठेवा. सर्वप्रथम एका ग्लासामध्ये किंवा डब्यात पाणी भरुन ठेवा. त्यात कोथिंबीरीची मुळे बुडवून ठेवा. त्यामुळे कोथिंबीर फ्रेश राहील.

सावलीत ठेवा

कोथिंबीर धुवून झाल्यानंतर सूर्यप्रकाशासमोर ठेऊ नका. कोथिंबीरीची पानं नाजूक असतात, त्या लवकर सुकतात. उन्हामुळे कोथिंबीर फ्रेश राहत नाही. म्हणून सावलीत कोथिंबीर वाळत ठेवा.

कंटेनरचा वापर करा

कोथिंबीर धुवा नंतर ती निवडून झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात ठेवा. कोथिंबीर सुकण्याची भीती असल्यास त्यात ओला टिश्यू पेपर टाकून ठेवा.

कोथिंबीर ताजी राहील

कोथिंबीर सुकू नये असे वाटत असेल तर, कोथिंबीर बर्फाच्या पाण्यात धुवा. त्यामुळे पाने कोथिंबीर कोमेजणार नाहीत आणि अधिक काळ ताजी राहतील.

सुती कापडात भिजवून ठेवा

कोथिंबीर स्वच्छ करुन त्याची मुळे कापून सुती कापडात गुंडाळून ठेवा. आता त्यावर थोडे पाणी शिंपडा. ताजी हवा असेल तिथे ठेवा. ही पद्धत कोथिंबीर दीर्घकाळ ताजी ठेवण्यास मदत करेल.

अशी राहील ताजी

कोथिंबीर व्यवस्थित स्टोर न केल्यास ती लवकर खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवल्यास थंडीमुळे खराब होईल.

अशी राहील ताजी

त्यामुळे कोथिंबीर स्वच्छ करुन मुळापासून समान कापून ठेवावी. नंतर एका काचेच्या बरणीत एक कप पाणी भरा आणि त्यात कोथिंबीर ठेवा. त्यामुळे कोथिंबीर बराच काळ ताजी राहू शकते.

VIEW ALL

Read Next Story