रेल्वे स्टेशनवर IRCTC चा रुम कसा बुक करावा?

May 31,2024

रेल्वे

Indian Railway : रेल्वे प्रवासादरम्यान ट्रेनला येण्यास अपेक्षेहून अधिक वेळे होणार असेल किंवा काही तासांच्या फरकानं दुसरी ट्रेन असेल तर आता चिंता करण्याचं कारण नाही.

रेल्वे स्थानक

आता रेल्वे स्थानकावरच तुम्हाला आराम करण्यासाठी एक खोली/ Room उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिथं तुम्ही ठराविक काळासाठी थांबू शकता.

IRCTC

IRCTC कडून भारतातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर रिटायरिंग रूम ही सुविधा पुरवण्यात येते. ही रुम बुक करण्यासाठी सर्वप्रथम आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

रिटायरिंग रूम

डॅशबोर्डवर तिकीट बुकिंगच्या खालीच रिटायरिंग रूम हा पर्याय तुम्हाला दिसेल, जिथं पीएनआर क्रमांक देऊन प्रवासाचा इतर तपशील भरावा.

पेमेंट

पुढं पेमेंटचा पर्याय निवडून पैसे भरून काही मिनिटांतच तुमता रिटायरिंग रूम बुक होईल. या सुविधेअंतर्गत तुम्ही एसी, नॉन एसी अशा रुमचे पर्याय निवडू शकता.

माफक शुल्क

तासांच्या हिशोबानं हे रुम बुक केले जातात. अगदी माफक शुल्क आकारून ही रूम प्रवाशांना बुक करता येते.

प्रवास

रेल्वेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या या सुविधेमुळं प्रवास आणखी सुखकर होतो असं म्हणणं गैर ठरणार नाही.

VIEW ALL

Read Next Story