एटीएममधून फाटलेली नोट आल्यास घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही.
RBI च्या नियमानुसार या नोटा सहजपणे बदलता येतात. पण, त्यासाठी काय करावं?
फाटलेली नोट मिळाल्यास कोणत्याही करन्सी चेस्ट शाखेमध्ये जाऊन ही नोट बदलता येऊ शकते.
आरबीआयच्या कार्यालयात जाऊनही नोट बदलता येते. यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नसते.
तुमच्याकडे पाच फाटलेल्या नोटा असल्यास त्या बँकेच्या काऊंटवरही बदलता येतात.
पाचहून अधिक फाटलेल्या नोटा असल्यास त्या मात्र चेस्ट शाखेमध्ये जाऊनच बदलण्याचा सल्ला दिला जातो. कोणतीही बँक फाटलेली नोट बदलण्यास नकार देऊ शकत नाही.