विवाहबाह्य संबंधातून बाहेर पडायचंय? जाणून घ्या या टिप्स..

Aug 23,2023

एखादी स्त्री किंवा पुरुष आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीशी मानसिक किंवा शारीरिक संबंध बनवतो तेव्हा त्याला विवाह बाह्यसंबंध किंवा एक्स्ट्रा अफेअर म्हटलं जातं.

अनेक वेळा चूक लक्षात आल्यानंतरही ते मान्य करण्याची धैर्य होतं नाही. पण चूक मान्य केल्यास तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत होऊ शकतं.

तुमच्या पार्टनरला अफेअरबद्दल सर्व काही खरं-खरं सांगितलं पाहिजे. कुठल्या परिस्थितीत तुम्ही बाहेर गुंतल्या गेल्यात ते पार्टनरला पटवून द्या.

विवाह बाह्य संबंध तोडण्याचा निर्णयानंतर संबंधित व्यक्तीशी बिलकुलही संपर्क ठेवू नका.

यातून बाहेर पडताना स्वतःला दोषी ठरवून नका. उलट पार्टनरची माफी मागून तुमच्यातील नातं आणि हरवलेला विश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करा.

विवाहबाह्य संबंधातून बाहेर पडताना समोरील व्यक्तीशी या निर्णया मागचं कारण पटवून आपण वैवाहिक जीवनात परत जात असल्याचं समजून सांगा.

अनेक वेळा भावनाच्या भरात तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकतात. रागावर आणि भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही मानोसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story