डाळ शिजायला ठेवल्यास कुकरमधून पाणी बाहेर येते आणि मग झाकण खराब होते. यासाठी प्रथम डाळ धुतल्यानंतर ती कमीतकमी 15 ते 20 मिनिटे भिजवून ठेवा.
कुकर धुताना किंवा काहीश्या बेफिकीरीने तो हाताळला जातो. यामुळे देखील स्क्रू सैल होतात. तेव्हा घरात एक छोटासा स्क्रू ड्रायव्हर ठेवावा. जेणेकरून सैल झालेले स्क्रू टाईट करता येतात.
प्रेशर कुकरचं रबर सैल झालं असेल तर थंड पाणी, गव्हाचं पीठ किंवा टेपचा वापर करून तुम्ही रबर पुन्हा घट्ट करू शकता. यामुळे रबरमधून हवा बाहेर येणार नाही.
प्रेशर कुकरच्या हॅण्डलमुळे वाफ आणि इतर पातळ पदार्थ बाहेर निघत असतील तर कुकरचे एकापेक्षा जास्त भाग खराब झालेले असू शकतात. जेव्हा तुम्ही जेवण बनवता तेव्हा कुकरच्या झाकणातून अन्न बाहेर येतं, असे होत असल्यास कुकर अर्ध्यापेक्षा जास्त भरू नका.
कुकरमध्ये काहीही बनवतांना वाफेमुळे झाकण घट्ट लागू शकतं. काही खाद्यपदार्थ स्टिम वेंट ब्लॉक करतात जसं की पास्ता, तांदूळ आणि इतर काही पदार्थ हे पदार्थ वाफेसह वर येतात वाफ बाहेर येणं रोखतात हे अनेकदा धोकादायक ठरू शकतं.
प्रेशर नीट येत नसेल तर कुकरचं झाकण तपासून पाहा. प्रेशर कुकरचा वापर 3 वेळा जास्त वेळा करत असाल तर गॅसकेट बदला. तसेच जेवण बनवताना पाण्याचे प्रमाण तपासा. पाणी कमी जास्त नसेल याची खात्री करा.
यासाठी डाळ, भात बनवताना एक चमचा तेल किंवा तूप डाळ आणि भातात मिसळा. याशिवाय डाळ, बीन्स, शेंगा किंवा भात शिजवताना प्रेशर कुकरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरू नका.