प्रजासत्ताक दिन ((26 January Republic Day) आणि स्वातंत्र्य दिन (15 August Independence Day) याबद्दल अनेक लोक संभ्रमात असतात. हे दोन्ही दिवस वेगळे आहेत आणि ते साजरे करण्याची पद्धतही वेगळी आहे.

Jan 25,2024


15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या गुलामीतून आपली सुटका झाली आणि भारताचा ध्वज देशभरात फडकावला गेला. म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.


26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्या नंतर 3 वर्षांनी भारतीय राज्यघटना देशभरात लागू करण्यात आली. देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी या दिवशी संविधान लागू करण्यात आलं


स्वातंत्र्य दिनाला 'ध्वजारोहण' केलं जाते तर प्रजासत्ताक दिनाला ध्वज 'फडकावला' जातो.


स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं जातं. प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वज फडकवला जातो.


स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकावला जातो.


15 ऑगस्टला तिरंगा वर खेचून मग ध्वजारोहण केलं जातं तर प्रजासत्ताक दिनी ध्वज शीर्षस्थानी आधी बांधला जातो आणि मग तो तिथेच उघडून फडकवला जातो.

VIEW ALL

Read Next Story