असं असलं तरी प्रत्येक विभागाची सॅल्युट करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. ती कशी आहे हे पाहूया.
भारतीय लष्करात सैनिक उजव्या हाताने सॅल्युट करतात. उजव्या हाताची बोटं ही चेहऱ्याच्या भुवयांना स्पर्श करतात.
असं म्हटलं जातं की, जहाजाची कामं करताना हात खराब होतात. या खराब हातांनी वरिष्ठांना सॅल्युट करताना त्यांना अपमान होऊ नये याकरीता हाताचा तळवा दिसू दिला जात नाही.
त्यामुळे नौदलात सॅल्युट करताना उजव्या हाताचा पंजा हा जमिनीच्या दिशेने 90 डिग्रीत झुकलेला असतो.
लष्कर आणि नौदलाप्रमाणे वायूसेनेची सॅल्युट करण्याची वेगळी पद्धत आहे. वायूदलात सॅल्युट करताना हाताचा पंजा 45 डिग्रीत झुकलेला असतो.
विमानाच्या उड्डाणाप्रमाणेच वायूसेनेची प्रत्येक कामगिरी यशस्वी व्हावी. म्हणून वायूसेनेत सॅल्युट करण्याची अनोखी पद्धत आहे.