Indian Railway

आलिशान महालाहून कमी नाहीत Indian Railway च्या 'या' ट्रेन; तिकीट दर माहितीयेत?

अनुभव आणखी खास

Indian Railway luxury Trains: रेल्वे प्रवासाचा हा अनुभव आणखी खास होतो, जेव्हा तुम्ही Palace on wheels चा आनंद घेता. ही एक अशी रेल्वे आहे ज्यामध्ये तुम्हाला चक्क एखाद्या महालात असल्याचा अनुभव मिळतो.

पंचतारांकित हॉटेल

पंचतारांकित हॉटेलमधील प्रत्येक लहानमोठी सुविधा या रेल्वेमगाडीमध्ये तुम्हाला मिळते. याच धर्तीवर देशात इतरही काही आलिशान रेल्वेगाड्या आहेत. इथं प्रवास करण्यासाठी तुम्ही फक्त थोडा जास्त रक्कम खर्च करणं अपेक्षित आहे. हो, पण प्रवासाचा अनुभव अविस्मरणीय असेल हे मात्र नक्की...

महाराजा एक्स्प्रेस

महाराजा एक्स्प्रेस ही त्यातलीच एक ट्रेन. जिथं तुम्हाला राजस्थान भ्रमंतीची संधी मिळते. आग्रा, जयपूर, बिकानेरपर्यंत फिरण्याची संधी तुम्हाला या रेल्वे प्रवासातून मिळते. या रेल्वेनं तुम्ही जास्तीत जास्त 7 दिवस भटकंती करू शकता.

प्रवासाचा खर्च

या रेल्वेतून प्रवास करण्यासाठीच्या भाड्याविषयी सांगावं तर, त्यासाठी तुम्ही स्पेशल सुईटसाठी 24890 डॉलर म्हणजेच 20,47,445 आणि नॉर्मल सुईटसाठी 14490 डॉलर म्हणजेच 1191943 रुपये इतकी रक्कम भरावी लागते. यामध्ये 7 दिवसांचा सर्व प्रवासखर्च समाविष्ट आहे.

गोल्डन चॅरियट

गोल्डन चॅरियट या आलिशान रेल्वेमधून तुम्ही कर्नाटक आणि इतर दाक्षिणात्य भागातून प्रवास करता. कर्नाटकातील सुरेख पर्यटनस्थळं तुम्ही पाहू शकता.

खर्च किती?

या रेल्वेनं प्रवास करताना प्राईड ऑफ कर्नाटक या टूरसाठी तुम्हाला 732060 इतकी रक्कम भरावी लागते. या रेल्वेंशिवाय बौद्ध सर्किट, रामायण सर्किट अशा रेल्वेही तुम्हाला अशाच काहीशा आलिशान प्रवासाचा अनुभव देतात.

डेक्कन ओडिसी ट्रेन

कोल्हापूर, नाशिक, कच्छ, मुंबई, आगरा, उदयपूर, रणथंबोर, हैदराबाद, भावनगर, हंपी यांसारख्या शहरांमधून फिरण्याची संधी देणारी रेल्वे म्हणजे डेक्कन ओडिसी ट्रेन.

7 दिवसांच्या प्रवासासाठी...

या रेल्वेनं 7 दिवसांच्या प्रवासासाठी तुम्ही स्पेशल सुईटसाठी 17850 म्हणजेच 1468336 रुपये आणि नॉर्मल सुईटसाठी 11,900 डॉलर म्हणजेच 978891 रुपये भरता.

VIEW ALL

Read Next Story