रेल्वे तिकीट Confirm करण्यात अडचणी येतायत? वापरा ही लाखामोलाची Trick
कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या अनेकांनाच याची प्रचिती आली असावी. कारण, उन्हाळी सुट्टी असो, शिमगा असो किंवा मग गणेशोत्सवाची सुट्टी असो चाकरमानी कैक महिने आधीच तिकीटाचं बुकींग करून ठेवतात. बरेचजण या संधीला मुकतात.
रेल्वेचं तिकीट काढताना एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला नियमांची कल्पना असणं.
तुमच्या प्रवासाच्या तारखेपूर्वी नेमकं किती दिवस आधी तिकीट काढणं अपेक्षित आहे याची माहिती करून घेणं कधीही महत्त्वाचं ठरतं.
प्रत्येक श्रेणीच्या वेगळे आहेत. रेल्वेच्या जनरल डब्यातून 199 किमीचा प्रवास करायचा झाल्यास तुम्हाला प्रवासाच्याच दिवशी तिकीट काढण्याची मुभा असते.
200 किंवा त्याहून अधिक किमीचा प्रवास करायचा झाल्यास तुम्ही 3 दिवस आधी तिकीट काढणं अपेक्षित असतं. ही प्रक्रिया प्रत्यक्ष रेल्वे स्थानकावर जाऊनही करता येते.
प्रवासाच्या किमान 4 महिने आधीही तिकीट बुक करण्याची मुभा रेल्वेकडून प्रवासांना दिली जाते.
थोडक्यात नियमानुसार प्रवासाच्या 120 दिवस आधीच तिकीटाचं बुकींग करावं लागतं. तर, तात्काळ तिकीट प्रवासाच्या एक दिवस आधी बुक करता येते.
3 एसी आणि त्यावरील श्रेणीसाठीच्या तिकीटासाठीचं बुकींग हे सकाळी 10 वाजता तर, स्लीपर तात्काळचं बुकिंग सकाळी 11 वाजता सुरु होतं.
थोडक्यात रेल्वेनं प्रवास करताना आपलं तिकीट आरक्षित व्हावं असं वाटत असल्यास ते बरंच आधी बुक करा, तिकीट बुकिंगचे नियम जाणून घ्या आणि सोबतीनं इतरही पर्याय खुले ठेवा.