भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. 1853 साली पहिली ट्रेन सुरु झाली होती.
56 वर्षे ट्रेनमध्ये टॉयलेट नव्हते. मग 1909 मध्ये पहिल्यांदा याची व्यवस्था करण्यात आली.
त्याआधी रेल्वे रुळावर मलमूत्र सांडायचे, असे सांगितले जाते.
2011 मध्ये पहिल्यांदा बायो टॉयलेटचा वापर करण्यात आला.
आता बहुतांश ट्रेनमध्ये बायो टॉयलेटचा वापर केला जातोय.
रेल्वे रुळावर सांडत नाही, मग हे टॉयलेट जाते कुठे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
ट्रेनमध्ये टॉयलेट सीटच्या खाली बायो डायजेस्टर कंटेनर लावलेला असतो.
बायो डायजेस्टर कंटेनरमध्ये एनेरॉबिक बॅक्टेरिया असतात.
एनेरॉबिक बॅक्टेरिया प्रवाशांच्या मलमुत्राचे गॅसमध्ये रुपांतर करतात.