भारतात खूप ट्रेन दूर पल्ल्याच्या असतात. अशावेळी तुम्हाला ट्रेनमधून रात्रीचा प्रवास करावा लागतो.
रात्रीच्या प्रवासावेळी प्रवाशांची झोपमोड होऊ नये म्हणून रेल्वेचे काही नियम आहेत.
रात्री 10 नंतर टीटीई म्हणजेच रेल्वे ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर तुमचे तिकीट तपासू शकत नाही.
ट्रेनमधील कॅटरिंग आणि इतर स्टाफलादेखील शांतता ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले असतात.
तुम्ही ग्रुपने प्रवास करत असाल तर शांतता बाळगणे गरजेचे असते.
रात्री 10 वाजल्यानंतर मोठ्या आवाजातील गाणी वाजवू नये.
रात्री 10 नंतर ट्रेनमध्ये जेवण घेऊन कोण येणार नाही. असे असले तरी तुम्हाला पॅन्ट्रीतून जेवण मिळू शकते.
रात्री 10 नंतर ट्रेनच्या डब्ब्यातील लाईट बंद करायला हव्यात. फक्त नाईट लाईटच सुरु असावी.