सध्याच्या सरकारमध्ये असणारे केंद्रीय मंत्री तसेच खासदार ज्योतिरादित्य शिंदे हे राजघराण्याचे सदस्य आहेत. ते आलिशान महलात राहतात.
ज्योतिरादित्य शिंदेंच्या मालकीच्या महलामधील दरबार हॉलमध्ये राजघराण्यातील महत्त्वाच्या बैठका व्हायच्या.
या हॉलला सजवण्यासाठी 560 किलो सोनं वापरण्यात आलं असून त्यातूनच त्याला राजेशाही थाट दिसून येतो, असं डीएनएने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
दरबार हॉलच्या छप्पराचा मजबूतपणा तपासून पाहण्यासाठी आठ हत्तीचा वापर करण्यात आला होता असं सांगतात.
त्यामुळे या महलातील हॉलमधील छप्पर मोठमोठ्या झुंबरांचं वजन सहज पेलू शकतं. अशी काही झुंबरं येथे टांगलेली आहेत.
या महलामधील डायनिंग टेबलवर मध्यभागी खेळण्यातील रेल्वे ट्रॅकप्रमाणे ट्रॅक असून यावरुन चांदीची एक छोटी ट्रेन धावते. या ट्रेनमधून पाहुण्यांना वेगवेगळे पदार्थ वाढले जातात.
या महलामधील एकूण 35 खोल्यांमध्ये राजवाड्यासंदर्भातील संग्रहालय साकारण्यात आलं आहे.
शिंदे घरण्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी ज्यामध्ये आलीशान कार्स, वेगळं फर्निचर आणि हत्यारांचा समावेश आहे.
जय विलास नावाचा हा महाल 1876 साली प्रीन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस मेरी ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आला होता.
19 व्या शतकामध्ये जय विलास महाल बांधण्यात आला तेव्हा त्याची किंमत 1 कोटी रुपये इतकी होती.
आता जय विलास महालाची किंमत 4 हजार कोटींहून अधिक आहे.
सध्या या जय विलास महालाची मालकी वंश परंपरेनुसार ज्योतिरादित्य शिंदेंकडे आहे.
आजही वापरात असलेला हा जय विलास महाल इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे.
जय विलास महाल हा केवळ ज्योतिरादित्य शिंदेंचं घर नसून भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचं पान आहे.
जय विलास महाल ही वास्तू म्हणजे कला, स्थापत्यशास्त्र आणि राजेशाही इतिहासाचं मूर्तीमंत उदाहरण आहे.