रात्री किंवा पहाटे नव्हे, भारतात 'या' वेळी होतात सर्वाधिक रस्ते अपघात
2022 या वर्षी देशात 4 लाख 61 हजारहून अधिक अपघात झाले होते. यामध्ये 1 लाख 68 हजार जणांनी प्राण गमावले. तर, यंदाच्या वर्षी आतापर्यंत 1264 अपघात झाले असून, यामध्ये 462 जणांचा मृत्यू ओढावला.
राहिला मुद्दा सर्वाधिक अपघात कधी होतात या प्रश्नाचा, तर ते रात्री नव्हे, मध्यरात्र उलटून 3 वाजण्याच्या सुमारासही नव्हे तर, सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 60 टक्के अपघात होतात.
रात्रीच्या वेळी फक्त 10 टक्के अपघात होतात. सर्वाधिक अपघात सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजण्याच्या सुमारास होतात. तर, रात्री 12 ते 3 वाजण्यादरम्यान 5 टक्के अपघात होतात.
मध्यरात्र उलटून 3 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत 5.9 टक्के अपघात होतात. तर, सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत 10.7 टक्के अपघात होतात.
आकडेवारीनुसार सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 14.8 टक्के अपघात होतात. तर, दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत 15.5 टक्के अपघात होतात.
दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 17.8 टक्के अपघातांची नोंद करण्यात आली आहे.