हे तर कमाल! आता हप्ते भरून करा ज्योतिर्लिंग यात्रा; IRCTC चं अफलातून पॅकेज
इतकंच नव्हे, तर देश फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठीसुद्धा IRCTC नं आतापर्यंत काही कमाल पॅकेज लॉन्च केले आहेत.
आता यात नव्यानं आणखी एका पॅकेजची भर पडणार आहे. कारण, आयआरसीटीसीकडून तुम्हाला थेट ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडणार आहे.
महाकालेश्वर, ओंकारेश्वर, सोमनाथ, द्वारकाधीश, त्र्यंबकेश्लवर , भीमाशंकर या ज्योतिर्लिंगांचं दर्शन तुम्ही घेऊ शकणार आहात.
22 जून 2023 पासून सुरु होणारी ही यात्रा 1 जुलैपर्यंत सुरु राहील. थोडक्यात 9 रात्री आणि 10 दिवस असा या यात्रेचा कालावधी असेल.
आता तुम्ही म्हणाल इतकी ठिकाणं आहेत, तर ही यात्रा खिशाला परवडण्यापलीकडेच असेल.... पण, तसं नाहीये.
तुम्ही महिन्याचा हप्ता भरूनही ही यात्रा करु शकता. थो़डक्यात तुम्हाला यात्रा खर्च म्हणून आकारली जाणारी रक्कम एकत्र भरावी लागणार नाही. अवघे 905 रुपये तुम्ही इथं दर महिन्याला भरू शकता.
स्लीपर क्लासमध्ये तीन व्यक्ती एकत्र राहिल्यास या यात्रेसाठी 18, 466 रुपये प्रति व्यक्ति इतका खर्च येणार आहे.
गोरखपुर, बस्ती, मनकापुर जं., अयोध्या कँट., बाराबंकी जं., लखनऊ, कानपुर, उरई आणि वीरांगना लक्ष्मीबाई स्टेशन या स्थानकांवरून प्रवासी या यात्रेत सहभागी होऊ शकतात.
यात्रेसाठी तब्बल 767 बर्थ असून, त्यांची विभागणी विविध श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. ज्याचं आरक्षण प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केली जाईल.