जुलै महिन्यात सुरु झालेल्या चांद्रयान मोहिमेला 23 ऑगस्ट 2023 ला यश मिळालं. हा तोच क्षण होता जेव्हा चांद्रयानानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं होतं. तिथं चंद्रावर विक्रम लँडर यशस्वीरित्या पोहोचलं आणि इथं चांद्रयान मोहिमेत योगदान देणाऱ्या प्रत्येक कंपनीला प्रचंड नफा झाला.
साधारण 615 कोटी रुपयांच्या खर्चानं साकारलेल्या या मोहिमेमध्ये कायन्स टेक्नोलॉजीची महत्त्वाची भूमिका होती. या कंपनीनं रोवर आणि लँडरसाठी यंत्रांचे सुटे भाग पुरवले होते.
चांद्रयान 3 मोहिमेला यश मिळत गेलं आणि इथं कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळाली. परिणामी ramesh kunhikannan यांच्या संपत्तीचा आकडाही सातत्यानं वाढत गेला.
नोव्हेंबर 2023 मध्ये रमेश कुन्हीकन्नन यांच्या नावाचा समावेश जागतिक स्तरावरील अब्जाधीशांमध्ये करण्यात आला. किंबहुना त्यांची एकूण संपत्ती या क्षणालासुद्धा वाढतच आहे.
Forbes च्या माहितीनुसार रमेश कुन्हीकन्नन यांची एकूण संपत्ती आता 1.1 अब्ज डॉलर्स इतकी म्हणजेच साधारण 9200 कोटी रुपये इतकी झाली आहे.
मागील 6 महिन्यांमध्ये त्यांच्या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा दिला आहे.
ऑगस्ट 2023 ला कंपनीच्या एका शेअरची किंमत 1798रुपये होती. डिसेंबर महिन्यात हीच किंमत 2425 रुपयांवर आली आणि कंपनीला घसघशीत नफा झाल्याचं पुन्हा स्पष्ट झालं.