घरीच तो बनवण्यास सुरुवात

How To Make restaurant like Crispy Dosa at Home? : इतकंच काय, तर वारंवार बाहेर गेलं असता हा डोसाच मागवणाऱ्या मंडळींनी आता आता तर, घरीच तो बनवण्यास सुरुवातही केली आहे.

Jul 25,2023

डोसा पीठ

तांदुळ, उडदाची डाळ, चिमुटभर मेथीचे दाणे अशा पदार्थांना एकत्र करत डोसे बनवण्यासाठीचं पीठ तयार केलं जातं. यामध्ये इतकं Perfection असतं की पीठ आंबल्यानंतर कापसासारखे मऊ, आणि पातळ डोसे केल्यास ते कमालीचे कुरकुरीत होतात.

डोसे तव्यावर चिकटण्यास सुरुवात होते

हो, पण हे गणित बिनसल्यास मात्र डोसे तव्यावर चिकटण्यास सुरुवात होते. मग काय, तवाच चांगला नाही, पीठच आलं नाही ही अशी कारणं देण्यास सुरुवात होते.

आता तसं होणार नाही

आता तसं होणार नाही. काही सोप्या ट्रीक्स वापरून तुम्ही अगदी बाहेर मिळतो तसा डोसा घरी बनवी शकता तोही, झटपट. यासाठी प्रथम तव्याला कास्ट करणं अर्थात त्याला राबवणं गरजेचं आहे.

तेल लावून घ्या

तवा गरम करून त्यावर तेल लावून घ्या, नंतर गॅस बंद करत तव्याचं तेल एका टिश्यू पेपरनं टिपून काढा. असं करताना हात भाजणार नाही, याची काळजी घ्या.

तव्यावर पीठ टाकण्याआधी...

आणखी एक पद्धत म्हणजे तव्यावर पीठ टाकण्याआधी 5 चमचे पाण्यात 4 चमचे तेल आणि चिमुटभर मीठ मिसळा. आता हे मिश्रण तव्यावर कांद्याच्या मदतीनं लावा. बघा डोसा चिकटणार नाही. हो पण मिश्रण तव्यावर घासलं जाईल अशा पद्धतीनं लावा.

डोसा कुरकुरीत व्हावा यासाठी ...

डोसा कुरकुरीत व्हावा यासाठी तुम्ही त्याच्या पिठात रवा मिसळू शकता. पीठ आंबल्यानंतर त्यात रवा मिसळून तो व्यवस्थित एकजीवर करून घ्या. ज्यानंतर डोसा बनवा. लक्षात ठेवा डोश्याचं पीठ एकदम घट्ट नसूद्या. पीठ फ्रिजमधून बाहेर काढत लगेचच त्यापासून डोसा बनवू नका.

तवा स्वच्छ करून तो गरम करून घ्या

डोसा बनवण्याआधी तवा स्वच्छ करून तो गरम करून घ्या. डोसा बनवताना वारंवार आच कमी - जास्त करू नका. डोसा तव्यातून काढताना उलटण्याला पाणी किंवा तेल लावा.

VIEW ALL

Read Next Story