तुम्हाला शेअर मार्केटमधील सर्वात महागडे 5 शेअर्स कोणते आहेत ठाऊक आहे का?
जगातील प्रसिद्ध टायर कंपनी असलेल्या एमआरएफच्या शेअर्सनं एक नवा विक्रम मागील आठवड्यात केला.
13 जून रोजी एमआरफच्या शेअर्सची किंमत प्रती शेअर 1 लाखांच्या वर गेली.
भारतीय शेअर बाजारामध्ये कोणत्याही कंपनीच्या एका शेअरची किंमत 1 लाखांपर्यंत पोहचण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
13 जून रोजी एमआरएफच्या एका शेअरसाठी तब्बल 1 लाख 150 हजार रुपये मोजावे लागत होते.
मात्र अशाप्रकारे सर्वात महागड्या शेअर्समध्ये केवळ एमआरफचाच क्रमांक लागतो असं नाही.
भारतीय शेअर बाजारामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत त्यांच्या एका शेअरसाठी तुम्हाला महिन्याभराचा पगार खर्च करावा लागेल. हे शेअर्स कोणते पाहूयात...
सर्वात महागड्या शेअर्सच्या यादीमध्ये एमआरएफ खालोखाल क्रमांक लागतो तो 'हनीवेल ऑटोमेशन इंडिया' या कंपनीचा.
मागील आठवड्यामध्ये 'हनीवेल ऑटोमेशन इंडिया'च्या एका शेअरची किंमत 42 हजार 43 रुपये इतकी होती.
भारतीय शेअर बाजारामधील सर्वात महाग शेअर्सच्या यादीमध्ये तिसरी कंपनी आहे 'पेज इंडस्ट्रीज'.
'पेज इंडस्ट्रीज'चा एक शेअर मागील आठवड्यात 38 हजार 622 रुपयांना विकत घेता येत होता.
सर्वात महागड्या शेअर्सच्या यादीत टॉप फोरमध्ये 'थ्री एम इंडिया' या कंपनीचा क्रमांक लागतो.
'थ्री एम इंडिया'चा एक शेअर खरेदी करण्यासाठी 27 हजार 767 रुपये खर्च करावे लागत होते.
सर्वात महागड्या शेअर्सच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी 'श्री सिमेंट' ही कंपनी आहे.
'श्री सिमेंट'चा एक शेअर 26 हजार 67 रुपयांना उपलब्ध होता.
वरील शेअर्सच्या किंमतीची सर्व आकडेवारी ही 15 जून 2023 च्या दरांप्रमाणे आहे.