भारतातील हे सिरीयल किलर माणसाच्या रक्ताला चटावलेले मनुष्य रुपातील हिंस्त्र श्वापद आहेत.
सुरेंदर कोली हा नोएडाच्या निठारी हत्याकांडाचा सुत्रधार आहे. लहान मुलांचं अपहरण करुण त्यांची हत्या करुन तो त्यांचे मांस शिजवून खायचा. 20 मुलांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
मोहन कुमार याला सायनाइड म्हणूनही ओळखले जायचे. तरुणींचं लैंगिक शौषण केल्यानंतर त्यांना गर्भनिरोधक गोळीच्या नावाखाली सायनाइड खायला देऊन तो हत्या करायचा. अशा प्रकारे त्याने 20 तरुणींची हत्या केलीय.
मल्लिका ही लेडी सिरीयस किलर आहे. घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या सहा महिलांची तिने हत्या केलेय.
जयशंकर हा लेडी किलर या नावानंही कुप्रसिद्ध होता. 2006 ते 2009 त्याने 30 महिलांवर लैंगिक अत्याचार करत 15 महिलांची हत्या केलेय.
डॉ. देवेंद्र शर्मा एक आयुर्वेदिक डॉक्टर होता. तो टॅक्सी चालकांना टार्गेट करायचा. देवेंद्र शर्मा ग्राहक म्हणून टॅक्सीमध्ये बसायचा आणि संधी साधून टॅक्सी चालकांची हत्या करायचा. दोन वर्षात त्याने 40 जणांची हत्या केली होती.