ज्यूस विक्रेता मोहम्मद आशिक ठरला MasterChef India 8 चा विजेता

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Dec 10,2023

Master Chef 2023 Winner

मास्टर शेफ इंडिया 2023 चा किताब 24 वर्षीय मोहम्मद आशिकने आपल्या नावावर केला आहे.

विजेतेपदापर्यंतचा प्रवास

मोहम्मद आशिकची प्रवास प्रेरणादायी आहे. गेल्यावर्षी पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर पडल्यानंतर आशिक पुन्हा एकदा मास्टर शेफमध्ये परतला. पण यावेळी तो विजेताच होऊन बाहेर पडला.

ज्यूस विक्रेता ते मास्टर शेफ विजेता

आशिक मंगलोरमध्ये एक ज्यूसचे दुकान चालवत असते. आपल्या कुकिंगच्या पॅशनला त्याने जीवंत ठेवलं. एकापेक्षा एक उत्तम डाएट पदार्थ बनवून त्याने परिक्षकांच मन जिंकल.

हातची चव

मास्टर शेफमध्ये आशिकच्या पदार्थांची खूप चर्चा झाली. एवढंच नव्हे तर शेफ रणवीर ब्रार, पूजा ढींगरा, विकास खन्ना यांनी दिलेल्या टास्कमध्ये मोहम्मदने सगळ्यांचच मन जिंकलं.

25 लाखाचे बक्षिस

मोहम्मदने 'मास्टर शेफ विनर 2023' चे विजेतेपद पटकावले. यासोबतच 25 लाखांचा चेक देखील मिळवला. मास्टर शेफमध्ये त्याने अनेक टास्क पूर्ण केले आहेत.

पावर कार्डचा वापर केलाच नाही

टास्क जिंकल्यावर पावर कार्ड मिळते. मात्र मोहम्मदने कधीच पावर कार्डचा वापर केला नाही. त्याने आपले सगळे टास्क पूर्ण केलेत.

फिनाले डिश

ओशियन व्यू नावाचा पदार्थ त्याने मास्टर शेफ 2023 च्या फायनलमध्ये तयार केला होता. या पदार्थाने त्याला या पदावर पोहोचण्यास मदत केली.

VIEW ALL

Read Next Story