अदानी-अंबानी यांच्याकडे इतका पैसा, की त्यात 15-15 मालदीव विकत घेतील

Jan 09,2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत-मालदीव वाद पेटला असून संपूर्ण जगाचं याकडे लक्ष आहे.

मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीकेमुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सर्व भारतीय संतापले आहेत.

सोशल मीडियावर #BycottMaldives आणि #ChaloLakshadweep हे दोन हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

दरम्यान दोन्ही देशांमधील तुलना केल्यास मालदीव भारतातील काही अब्जाशींच्या समोरही टिकणार नाही.

देशातील सर्वात श्रीमंत नागरिकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी आणि गौतन अदानी यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की, 15-15 मालदीव विकत घेतील.

मालदीवचा जीडीपी 6.5 अरब डॉलर्स आहे. त्यातही ते चीनकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझाखाली आहेत.

ब्लूमबर्गनुसार, मुकेश अंबानींकडे 96.8 अरब डॉलर्सची संपत्ती आहे.

तसंच गौतम अदानी यांच्याकडे 94 अरब डॉलर्सची संपत्ती आहे.

या हिशोबाने पाहिल्यास भारतातील या दोन अब्जाधीशांची 15-15 मालदीव खरेदी कऱण्याची क्षमता आहे.

VIEW ALL

Read Next Story