नकारात्मक विचार होतील सकारात्मक, करा 'हे' काम!

Pravin Dabholkar
Feb 16,2024


अनेकदा आपल्या मनात सारखे नकारात्मक विचार येतात.


पण अशावेळी काय करायचं हे आपल्याला समजत नाही.


नकारात्मक विचार घालवण्यासाठी रोज 10 मिनिटे काढून समीक्षण करा.


दिवसा कोणता निगेटिव्ह विचार आला असेल तर तो लिहून काढा. असा विचार का आला त्यावर विचार करा.


निगेटीव्ह विचार आले की व्यायाम करा. यामुळे हार्मोन्स रिलीज होऊन तुम्हाला चांगले वाटेल.


व्यस्त राहा. आवडीची कामे करा. आवडत्या मित्रांना भेटा.


त्रासाचं कारण लिहून काढा. लिहिल्याने मन हलके होते.


मेडिटेशन केल्याने नकारात्मक विचार दूर होतात. सकाळची वेळ यासाठी उत्तम.


मन भटकवण्यासाठी राहिलेली कामे करा. यामुळे कामदेखील पूर्ण होईल आणि व्यस्त राहायला कारण मिळेल.


चांगली पुस्तके वाचल्याने निगेटिव्हीटी दूर होते. मन शांत करण्यासाठी प्रेरणा देणारी पुस्तके वाचा.

VIEW ALL

Read Next Story