75 रुपयांचे चांदीचे नाणे, संविधानाची प्रत, नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी सर्व खासदारांना काय मिळणार?
नवीन संसद भवनात आजपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे फोटोशूट करण्यात आले.
नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी काही भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.
देशाच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचा इतिहास जपणाऱ्या जुन्या संसदेचा आज मंगळवारी (19 सप्टेंबर) निरोप घेतला जाणार आहे.
नवीन संसदेत खासदारांचा प्रवेश सकाळी 11 वाजता झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले.
हा विशेष दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी संसद, राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
भेटवस्तूमध्ये संविधानाची प्रत, 75 रुपयांचे चांदीचे नाणे आणि नवीन संसदेचा शिक्का असलेली पुस्तिका समाविष्ट आहे.
याशिवाय संसद भवनाच्या सीलसह इतर अनेक भेटवस्तूही यात असतील.