प्रवासादरम्यान कोणताही टोल टॅक्स आकारला जाणार नाही, त्यासाठी तुम्हाला फक्त हे काम करायचे आहे

Jan 07,2024


जर तुम्ही तुमच्या वाहनाने लांबचा प्रवास करत असाल तर हे महत्त्वाचं आहे. आज बरेच लोक त्यांच्या कार, दुचाकी किंवा टॅक्सी इत्यादींच्या मदतीने लांबचा प्रवास करतात.


बर्‍याच वेळा, लांबच्या प्रवासात, गुगल मॅप असे एक्सप्रेसवे सुचवतात, ज्यामुळे जास्त टोल आकारले जातात. त्यामुळे प्रवासाचा खर्च आणखी वाढतो.


त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्यानंतर युजर सहजपणे त्यांचा टोल टॅक्स कमी करू शकतात किंवा शून्यावर आणू शकतात.


नेव्हिगेशन आणि डायरेक्शसोबत, गुगल मॅप काही फिचर देखील देते प्रवास करणाऱ्यांसाठी खूप उपयोगाचे आहेत. त्यामध्ये टोल टॅक्स वाचवण्याचाही पर्याय आहे.


गुगल मॅप्स सहसा टोल रोड सुचवतो. तुम्हाला हवे असल्यास सेटिंगमध्ये 1-2 बदल करून तुम्ही टोल टॅक्स वाचवू शकता.


गुगल मॅप्सवर टोल-फ्री रस्ता शोधण्यासाठी, युजरने आधी त्यांना जिथे जायचे आहे ते स्थान शोधणे आवश्यक आहे. मग दिशा शोधा.


यानंतर उजवीकडे वरच्या बाजूला दिलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा. यानंतर 'Options' वर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल.


यामध्ये तुम्हाला फोन स्क्रीनच्या वरच्या भागात Avoid Toll चा पर्याय मिळेल, त्यासमोर दिलेला टॉगल इनेबल करा.


यानंतर, वाहन चालकांना नवीन रस्त्याचा पर्याय मिळेल, ज्यामध्ये युजर्सना टोल टॅक्सचा पर्याय दिसणार नाही.

VIEW ALL

Read Next Story