2 जून 2023 रोजी ओडिशातल्या बालासोर इथे झालेल्या कोरोमंडल रेल्वे अपघातात मृतांचा आकडा 288 वर गेला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 900 जण जखमी झालेत.
17 जुलै 1937 रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 119 जणांचा मृत्यू झाला होता. स्वातंत्र्यपूर्वी झालेला रेल्वेचा हा सर्वात मोठा अपघात आहे. कोलकातामध्ये हा अपघात झाला होता.
2 सप्टेंबर 1956 रोजी पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात 125 जणांचा मृत्यू झाला होता. हैदराबादपासून 100 किमी दूर असलेल्या मेहबुबनगर पुलावर हा अपघात झाला होता.
28 सप्टेंबर 1954 रोजी हैदराबादमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये 139 प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला. नदीमध्ये रेल्वे कोसळल्यामुळे हा अपघात झाला होता.
9 सप्टेंबर 2002 रोजी बिहारमधील रफिगंज स्थानकाजवळ हावडा-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला होता. पावसात रेल्वेरूळ विस्कळीत झाल्यामुळे हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये 140 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
23 डिसेंबर 1964 रोजी धनुष्यकोडी पॅसेंजर सिलीकॉनच्या वादळाच्या तडाख्यात अडकली. या दुर्घटनेमध्ये 150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
28 मे 2010 रोजी हावड़ा कुर्ला लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात झाला होता. रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये 170 जणांचा मृत्यू झाला होता.
26 नोव्हेंबर 1998 रोजी पंजाबमध्ये जम्मू तावी एक्सप्रेस आणि गोल्डन टेम्पल मेलच्या अपघातामध्ये 212 जणांचा मृत्यू झाला होता. जम्मू तावी एक्सप्रेसने गोल्डन टेम्पल मेलला धडक दिली होती.
2 ऑगस्ट 1999 रोजी आसामध्ये झालेल्या रेल्वे अपघातामध्ये 290 जणांचा मृत्यू झाला होता. आसाम एक्स्प्रेस आणि ब्रह्मपुत्र मेलचा गौसल स्टेशनवर अपघात झाला होता. या अपघातामध्ये लष्कराच्या काही जवानांचाही मृत्यू झाला होता.
20 ऑगस्ट 1995 रोजी भुवनेश्वर-दिल्ली पुरुषोत्तम एक्स्पेसने उत्तरप्रदेशमधील फिरोजाबाद येथे कालिंदी एक्स्प्रेसला धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये 358 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते.
6 जून 1981 रोजी बिहारमध्ये मानसी जंक्शनपासून सहरसा जंक्शनला जाणारी रेल्वे बागमती नदीच्या पुलावरून कोसळली. सरकारी आकडेवारीवरून अपघातात जवळपास 300 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर प्रत्यक्षदर्शींच्या मते देशातील या सर्वात मोठ्या रेल्वे अपघातात 800 जणांचा बळी गेला. पाण्यातून 250 मृतदेहच काढू शकले. 300 पेक्षा जास्त लोकांचा आजपर्यंत काहीही थांगपत्ता लागलेला नाही.