जे काही महान आहे, त्यावर कोणाचा अधिकार असू शकत नाही, हाच मुर्खपणा मनुष्य करतो. मनुष्याला अधिकार हवा असतो.
काळोख हा प्रकाशाची अनुपस्थिती आहे. अहंकार जागृकतेची अनुपस्थिती आहे.
जीवन एक कविता आहे, ती लिहिली गेली पाहिजे. हे गायले जाणारे गीत आहे. केले जाणारे नृत्य आहे.
कोणताच विचार नसेल, कोणतीच गोष्ट नसेल, कोणता पर्याय नसेल तर शांत राहा. स्वत:शी जोडून घ्या.
तुम्हाला काही हानीकारक करायचे असेल तर ताकदीची गरज आहे. अन्यथा प्रेम खूप आहे. करुणा खूप आहे.
तुम्हाला कधी भीती वाटली तर कारण शोधायचा प्रयत्न करा. तुम्हाला मृत्यू दिसेल. सर्व भीती हे मृत्यूसाठी असते. मृत्यू एकमात्र भय स्रोत्र आहे.
एक समूह, एक राष्ट्र, एक धर्म आणि एक जातीचे नव्हे तर पूर्ण अस्तित्वाचा भाग बना. सर्व उपलब्ध असताना आपल्याला छोट्या गोष्टींमध्ये का अडकावून घ्यायचे?
एक समूह, एक राष्ट्र, एक धर्म आणि एक जातीचे नव्हे तर पूर्ण अस्तित्वाचा भाग बना. सर्व उपलब्ध असताना आपल्याला छोट्या गोष्टींमध्ये का अडकावून घ्यायचे?
जितक्या जास्त चुका करता येतील तितक्या करा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा तीच चूक करु नका. तुम्ही यशस्वी व्हाल.