पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ कोणाला मिळतो?


स्वत:च घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही.


अशावेळी पंतप्रधान घरकुल योजना तुम्हाला मदत करते. पण त्यासाठी कोण पात्र असतं?


परिवाराकडे स्वत:चे घर नसेल तर लाभ घेता येतो.


परिवाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 18 लाखांच्या आत असायला हवे.


कुटुंबातील महिलने अर्ज केल्यास योजनेत प्राधान्य मिळते.


पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना याचा फायदा मिळतो.


अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागास वर्गातील उमेदवारांना यात प्राधान्य दिले जाते.


ईडब्ल्यूएस आणि एलआयजीच्या लोकांना यात सहभागी करुन घेतले जाते.


योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण दोघांनाही मिळतो.


दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही यात प्राधान्य मिळतं.


अर्जदाराचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

VIEW ALL

Read Next Story