अयोध्येत सोमवारी 22 जानेवारीला नवीन भव्य अशा राम मंदिरात रामलल्लाची नविन मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्यामुळे अशावेळी एक प्रश्न उपस्थित होतो आहे की, जुन्या मूर्तीचं काय करणार आहेत?
म्हैसूरचे मूर्तीकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची नवीन मूर्ती साकारली आहे. ही रामलल्लाची बालस्वरुपाची मूर्ती आहे.
51 इंच उंच असलेली ही रामलल्लाची मूर्तीची 22 जानेवारी सोमवारी प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.
रामलल्लाची मूळ मूर्ती ही सध्या तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आली आहे.
गर्भगृहात रामलल्लाच्या नवीन मूर्तीसमोर भगवान राम (बसलेल्या मुद्रेत) आणि त्यांच्या भावांच्या मूळ मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी ती नवीन मंदिरातील ‘गर्भगृहा’च्या आतील रामलल्लाच्या नवीन मूर्तीसमोर ठेवण्यात येईल.