पावसाळ्यात घाला असे कपडे
पावसाळ्यात उन्ह नसल्याने कपडे वाळत नाही आणि त्यांना वास यायला लागतो. अशावेळी जार्जेट आणि शिफॉनचे कपडे लवकर सुकतात.
हे फॅब्रिक पावसाळ्यासाठी उपयुक्त आणि आरामदायक आहे. हे कापड पाणी टिकू देत नसून लवकर वाळतं.
पावसाळ्यात खूप टाइट नसलं कपडे घाला. जर तुम्ही टाइट घातल्यास ते ओले झाल्यावर हे पारदर्शी होतात आणि आपले आतले कपडेही दिसू लागतात.
पावसाळ्यात आपल्या जवळ स्कार्फ किंवा स्टोल असू द्या.
पावसाळ्यात लाल, पिवळा, हिरवा अश्या रंगाचे कपडे घालून तुमचे पावसातील फोटो एक नंबर निघतील.
पावसाळ्यात चटक रंगाचे फ्लोरल प्रिंट उठून दिसतात. मोठे प्रिंट असलेले कुर्ते किंवा टॉप जे आपणं इतर सीझनमध्ये घालण्याआधी दहा वेळा विचार करतो ते या पावसाळ्यात बिंदास घालू शकता.