आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन साजरा करत आहेत. दरम्यान, काहीजण उद्या म्हणजेच 31 ऑगस्टला सण साजरा करणार आहेत.
बहिण भावाचा हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो. यामुळेच नवीन कपडे घातले जातात.
या दिवशी मुली पारंपारिक कपड्यांना प्राधान्य देतात. तर मुलंही सदरा, कुर्ता घालतात.
पण या दिवशी नवे कपडे घालताना एक रंगापासून दूर राहिलं पाहिजे.
हा रंग काळा आहे. रक्षाबंधनाला काळ्या रंगाचे कपडे घालू नये असं सांगितलं जातं. हाच रंग पूजेला किंवा चांगल्या कार्यक्रमांना न घालण्याचा सल्ला दिला जातो.
त्यामुळेच रक्षाबंधनाला राखी बांधताना किंवा राखी बांधून घेताना काळे कपडे घालू नका.
याऐवजी तुम्ही लाल, पिवळ्या रंगाचे कपडे घाला, जे रंग शुभ मानले जातात.