रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. पण लोकांच्या मनात ते कायम जिवंत राहतील.
जगासाठी ते केवळ उद्योगपतीच नव्हते तर लाखो तरुणांसाठी प्रेरणा होते.
तुम्हालादेखील रतन टाटा यांच्याप्रमाणे यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही त्यांनी शिकवलेल्या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात.
रतन टाटांनी आयुष्यात कधी हार मानली नाही. मग ते टाटा नॅनोचा विषय असो किंवा जॅगुआरचा.
ते कोणत्याच गोष्टीचे दडपण घ्यायचे नाहीत. धैर्य ठेवायचे.
रतन टाटा म्हणायचे, मी आधी निर्णय घेतो मग तो योग्य ठरवतो. कोणताही निर्णय घेण्याआधी तो निर्णय योग्य कसा केला जाईल, याचा मी विचार करतो, असे ते सांगायचे.
रतन टाटा बड्या लोकांपेक्षा सामान्य लोकांचा जास्त विचार करायचे. यासाठी ते टाटा नॅनोसारखी कमी किंमतीची कार घेऊन आले.
आधी सेवा मग व्यवसाय अशी त्यांची जगण्याची फिलोसॉपी होती. असा व्यवसाय ज्यामुळे लोकांचे भले होईल, याचा विचार ते सतत करायचे.