बोलणारी स्मार्ट बाटली

Smart Water Bottle चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिला माणसांच्या गरजेप्रमाणे तयार करण्यात आलं आहे. या बाटलीमुळे वापरणाऱ्यांना आपण दिवसभरात किती पाणी प्यायलो हे समजतं.

Aug 11,2023

पाणी पिण्याची आठवण

Smart Water Bottle तुम्हाला पाणी प्यायचं आहे याची आठवण करुन देते. याला Hydration System नाव देण्यात आलं आहे. ही सिस्टम लाइट किंवा स्पीकरच्या माध्यमातून आठवण करुन देते.

बाजारात अनेक पर्याय

बाजारात अनेक स्मार्ट बाटल्या उपलब्ध आहेत. यातील एक HidrateSpark देखील आहे. Apple आपल्या ऑनलाइन स्टोअरवरुन याची विक्री करतं. ही स्मार्ट बाटली ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीसह येते आणि मोबाइल अॅपशी कनेक्ट करु शकतो.

Apple करतं Hidrate Spark ची विक्री

Apple ने मागील वर्षी Hidrate Spark Water Bottle ला लिस्ट केलं होतं. आता ही Amazon वरही उपलब्ध आहे.

App च्या मदतीने करते काम

Hidrate Spark ही बाटली मोबाइल अॅपवरुन स्मार्टफोनशी कनेक्ट करता येते. हे अॅप HidrateSpark नावाने उपलब्ध आहे. iOS आणि Android अशा दोन्ही ठिकाणी हे उपलब्ध आहे.

किंमत किती?

Hidrate Spark Pro ची किंमत Amazon वर 12 हजार 222 रुपये आहे. याचा आणखी एक व्हेरियंट Hidrate Spark नावाने आहे. त्याची किंमत 7 हजार रुपये आहे. म्हणजेच एक साधा फ्रीज इतक्या पैशात विकत घेऊ शकतो.

Milton ची स्मार्ट बाटली

Milton चीही स्मार्ट बाटली आहे. यामध्ये Hydration System अलर्ट मिळतो. यामध्ये Smart Lid आहे, जे पाणी पिण्याची आठवण करुन देतं. यामध्ये ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजीही आहे.

Milton मध्येही अॅप कंट्रोल

Milton ची बाटलीही तुम्ही अॅपशी जोडू शकता. हे अॅप युजर्सला वय, वजन आणि पाणी पिणं याचं निरीक्षण करत असतं.

बाजारात अनेक पर्याय

ऑनलाइन मार्केटमध्ये Hydration System अलर्टसह अनेक पर्यायी बाटल्या उपलब्ध आहेत. तुम्ही त्या ऑनलाइन खरेदी करु शकता. पण त्याआधी त्याची माहिती नक्की वाचून घ्या.

VIEW ALL

Read Next Story