अॅनाकोंडा साप पाण्यात 10 मिनिटे आपला श्वास रोखून धरु शकतो.
आफ्रिकेत आढळणारा ब्लॅक माम्बाचा दंश झालेल्यांपैकी 99 टक्के जणांचा मृत्यू झालाय.
इनलॅंड टायपन सापाच्या विषात एका वेळेस 80 जणांना मारण्याची क्षमता असते.
साप बराच काळ काहीही न खाता राहू शकतो. शुष्क जागेत राहणे पसंत करतो.
साप वर्षभरात अनेकदा आपली त्वचा बदलतो. त्याला आपण कात टाकली असे म्हणतो.
भारतात सापाच्या 300 प्रजाती आढळतात. त्यातील 50 विषारी आहेत.
समोर धोका जाणवल्यास साप फुत्कारतो आणि उलटी करु शकतो.
सापांना जन्मत: ऐकू येत नाही, गारुडी पुंगी वाजवतो तेव्हा त्याच्या हाताच्या हालचालीप्रमाणे तो प्रतिक्रिया देतो.