नारळी पौर्णिमेला म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी आकाशात ब्लुमून दिसणार आहे. या वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र आज दिसणार आहे.
ब्लुमून म्हणजे काय आणि आकाशात खरंच चंद्र निळा दिसतो का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या.
30 ऑगस्ट रोजी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. या खगोलीय घटनेला ब्लू सुपरमून म्हटलं जाते. ब्लुमूनचा चंद्र या इतर दिवसांच्या तुलनेने अधिक तेजस्वी व चमकदार दिसतो.
ब्लूमून या शब्दाचा निळ्या रंगाशी कोणताही संबंध आढळत नाही. या उलट या दिवशी चंद्र नारंगी रंगाचा दिसतो.
वेगवेगळ्या ठिकाणांवरील वातावरणानुसार, चंद्राच्या रंगांमध्ये बदल होतात. जसं कुठे पांढरा शुभ्र, तर कुठे हलक्या लाल रंगाचा किंवा नारंगी, पिवळ्या रंगाचा चंद्र दिसून येतो.
विसाव्या शतकाच्या मध्यापासून एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास त्यांपैकी दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला 'ब्ल्यू मून' म्हणतात.
‘वन्स इन अ ब्ल्यू मून’ या संकल्पनेवरून पौर्णिमेला ब्लू मून असे नाव मिळाले आहे
दर दोन किंवा तीन वर्षांनंतर एकदाच हा दुर्मिळ योग अनुभवता येतो. 30 ऑगस्टनंतर आता थेट 31 मे 2026 रोजी ब्लू मून पाहायला मिळणार आहे.