टाटा समुहाने संपूर्ण पाकिस्तानला मागे टाकलं आहे.
मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजेच टाटा समुहातील कंपन्यांचं बाजारपेठीतील मूल्य हे 365 बिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचलं आहे.
365 बिलियन अमेरिकी डॉलर्स ही संख्या पाकिस्तानच्या संपूर्ण राष्ट्रीय सकल उत्पन्न म्हणजेच जीडीपीपेक्षाही अधिक आहे.
टाटा समुहाने हा एवढा मोठा टप्पा ओलांडणं दक्षिण आशियामधील आर्थिक घडामोडींमधील मोठी बाब मानली जात आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीचं एकूण मूल्य 170 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं एकूण मुल्य पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या अर्ध्याहून अधिक आहे.
टाटा मोटर्स, ट्रेण्ट, टायटन या टाटा समुहाच्या कंपन्यांचं मूल्य दुपट्टीने वाढलं आहे.
टाटा सन्स, टाटा कॅपिटल आणि विमान वाहतूक सेवेतील कंपन्यांमधील वाढती गुंतवणूक पाहता अंदाजे 160 ते 170 बिलियन अमेरिकी डॉलर्सची वाढ अपेक्षित आहे.
पाकिस्तानने बाहेरुन घेतलेल्या कर्जाचा बोजा 125 बिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.
भारताचा जीडीपी 3.7 ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स इतका असून 2028 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे.