शरीरावर कोणत्याही प्रकारचा टॅटू असलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नसल्याचे लहानपणापासून आपल्याला सांगितले जाते.
कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असलेल्या व्यक्तीच्या शरीरावर छोट्या आकाराचा टॅटू असला, तरी त्याला नोकरीसाठी अर्ज करता येत नाही.
चाचणी दरम्यान उमेदवाराच्या शरीरावर काही गोंदवलं आहे की नाही याची खात्री निवड करणारे अधिकारी करत असतात.
शत्रूद्वारे पकडले गेल्यावर टॅटूमुळे व्यक्तीची ओळख समजू शकते. असे घडू नये म्हणून सरकारी अधिकारी कधी शरीरावर काहीही गोंदवून घेत नाही
टॅटू असणाऱ्या व्यक्ती कामापेक्षा स्वत:चे शौक पूर्ण करण्याकडे लक्ष देत राहील असे अधिकाऱ्यांना वाटते.
टॅटू गोंदवताना शाई त्वचेच्या आत रक्तामध्ये मिसळत असते. यामुळे एचआयवी, हिपॅटायटीस A आणि B आणि अन्य त्वचा रोग होण्याची शक्यता असते. यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.