पावसाळ्याच्या सुरुवातीलाच टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. देशात काही ठिकाणी टोमॅटो 130 रुपये किलो इतके महाग झाले आहेत.
याशिवाय आलं 230 रुपये किलो तर हिरवी मिर्ची 150 रुपये किलो महाग झाली आहे.
मुंबईसह लखनऊ, चेन्नईत इतर भाज्यांचे भावही 60 ते 80 रुपये किलोवर गेले आहेत.
गेल्या 3 आठवड्यात टोमॅटोच्या किंमतीत 700 टक्के वाढ झाली आहे.
टोमॅटोला दर मिळत नसल्याने काही 2020 आणि 2021 ला शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकले होते. आता त्याच टोमॅटोने शंभरी पार केली आहे.
शेतपिकाची वाढ निसर्गावर अवलंबून असते. यंदा तीव्र उन्हाचा परिणाम पिकांवार पाहिला मिळाला. त्यानंतर अवकाळी पावसाने हातची पिकं वाया गेली
याशिवाय देशात काही ठिकाणी झालेल्या पुरामुळे फळ आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं.
बिपरजॉय वादळाचाही पिकांवर परिणाम झाल्याचं पाहिला मिळालं. वादळामुळे शेतकऱ्यांचं पीक बाजारापर्यंत पोहोचूच शकलं नाही
देशातल्या मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि गोरखपूर या चार महत्त्वाच्या शहरात टोमॅटोचे भाव मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत.
टॉमेटोच्या दर वाढल्यामुळे ग्राहक पुन्हा एकदा महागाईच्या कचाट्यात सापडले आहेत. टोमॅटोच्या पिकाला पावसाचा फटका बसल्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली आहे.