एकदा चलान कापलं तर त्या दिवसात पुन्हा ती कारवाई होतं नाही, असं अनेकांना वाटतं.
पण तुम्ही वेगळी चूक केला असाल तर वेगळे चलान कापले जाते.
वाहन कायद्या अंतर्गत काही नियम मोडल्यावर एका दिवशी एकच चलान कापले जाते.
पण हे सरसकट सर्वासाठी नसून ठराविक केससाठी आहे.
दिवसभरात पुन्हा चलान कापलं जाणार हे, संबंधित गुन्ह्यावर ठरतं.
तुम्ही सारखी ओव्हर स्पीडींग करत असाल तर दिवसभरात पुन्हा पुन्हा तुमचे चलान कापले जाऊ शकते.
सीटबेल्ट नसेल तरीदेखील दिवसातून एकाऐवजी वारंवार चलान कापले जाईल.
ओव्हरस्पिडींग आणि सीटबेल्टचा गुन्हा जाणूनबुजून केलेल्या गुन्ह्यात मोडतो.
विना हेल्मेट बाईक चालवत असाल तर दिवसातून एकदा चलान कापले जाईल.