जर चुकून एखाद्या अकाऊंट नंबरला तुम्ही पैसे पाठवले, तर ते पैसे तुमच्याच अकाऊंटला परत येऊ शकतात, किंवा त्या नंबरचं अकाऊंट असेल, तर दुसऱ्याच्या बँक अकाऊंटला हे पैसे जावू शकतात. दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे गेल्यानंतर, ते कसे परत मिळवायचे हा खरा प्रश्न आहे.
जर चुकून दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे गेले, तर लगेच, तात्काळ तुमच्या बँक शाखेला याविषयी माहिती द्या, अथवा बँकेच्या कॉल सेंटरशी संपर्क साधा आणि कळवा. अथवा ईमेल करा.
यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शाखेच्या बँक मॅनेजरला भेटा. ज्या बँकेच्या अकाऊंट नंबरवर हे पैसे गेले आहेत, तिच बँक तुम्हाला पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करू शकते.
आपल्या बँकेला चुकून झालेल्या बँक ट्रान्झॅक्शनविषयी सविस्तर माहिती द्या. ट्रान्झॅक्शनची तारीख, स्वत:चा अकाऊंट नंबर, ज्या अकाऊंटमध्ये चुकून पैसे गेले, त्या अकाऊंट नंबरची माहिती देखील द्या.
बँक आपल्या ग्राहकाच्या परवानगी शिवाय कोणालाही पैसे पाठवू शकत नाही. तसेच बँक आपल्या ग्राहकांविषयी माहिती देखील देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तक्रार दाखल करा.
तुम्ही ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा केले आहेत, ती व्यक्ती जर समजदार असेल, तर तुमचे पैसे, परत मिळण्याची शक्यता आहे. पण जर त्याने पैसे परत करण्यास नकार दिला, तर तुम्ही कायदेशीर कारवाईचं पाऊल उचलू शकतात.
मोठी रक्कम ट्रान्सफर करण्याआधी अगोदर लहान रक्कम ट्रान्सफर करावी. यामुळे रक्कम योग्य त्या अकाऊंटला जात आहे किंवा नाही याची खात्री करता येईल.