हिंदु धर्मात कोणत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृतदेह स्मशानात जाळला जातो.
स्मशानातून लोकं निघून जातात. पण काही वेळातच तेथे राख गोळा झालेली असते.
पण या राखेचे पुढे काय होते? तुम्हाला माहिती आहे का?
ही राख नदीमध्ये प्रवाहित केली जाते. पण असं का करतात?
राख नदीमध्ये प्रवाहित केल्यास आत्म्याला शांती मिळते, असं म्हणतात. गंगा नदी व्यतिरिक्त इतर नदीतही अस्थी सोडल्या जातात.
राख नदीत सोडण्याचं वैज्ञानिक कारण देखील आहे.
नद्या जिथून वाहतात तिथली जमिन उपजाऊ करतात.
शरीर जळल्यानंतर जी राख असते त्यात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. जी जमिनीला कसदार बनवते.
यामुळे मृतदेहाच्या राखेमुळे जमिन कसदार बनण्यास मदत होते असे सांगितले जाते.