पावसाळा चालू झाला की कांदाभजी, वडापाव खाण्याची खूप इच्छा होते. पण हे पदार्थ एका गोष्टीशिवाय अपूर्ण आहेत आणि ती गोष्ट म्हणजे हिरवी चटणी. पुदिना, मिरची, कोथिंबीर असे पदार्थ वापरुन बनवलेली ती झणझणीत चटणी पदार्थांची चव आणखी वाढवते.

Sep 07,2023


भारतीय जेवणात विविध प्रकारच्या चटण्यांचे अढळ स्थान आहे. चटणीची आंबट, गोड आणि मसालेदार चव जेवणाची चव वाढवते.पण ही चटणी अस्तित्वात कशी आली हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

संस्कृत शब्द

चटणी हा शब्द संस्कृत शब्द 'चाटनी' पासून आला आहे, ज्याचा अर्थ "चाटणे" असा होतो.

चटणीचा उगम

भारतातील चटणीचा इतिहास खूप जुना आहे. 17 व्या शतकात चटणीचा उगम झाला असे मानले जाते.

औषध म्हणून चटणीचा वापर

एकदा मुघल सम्राट शहाजहान आजारी पडला तेव्हा त्याच्या वैद्याने त्याला मसालेदार अन्न खाण्यास सांगितले. यानंतर शाहजहानच्या स्वयंपाक्याने पुदिना,धणे , जिरे, लसूण आणि सुंठ यांसारख्या गोष्टी एकत्र करून नीट बारीक करून पातळसर पेस्ट तयार केली.

.. त्यानंतर जेवणात चटणीचा झाला समावेश

चटणी चाखल्यानंतर हकीम म्हणाले, जेवणासोबत ती कमी प्रमाणात खा. या घटनेनंतर जेवणातील इतर पदार्थांसोबत चटणीही देण्यात येऊ लागली.

मुघलांच्या काळात चटणीला मिळाली प्रसिद्धी

मुघल काळात चटणी भारताच्या विविध भागात पसरली. मुघल शासकांनी चटणीसह अनेक नवीन पदार्थ आणि मसाले भारतात आणले.

VIEW ALL

Read Next Story