चार धाम यात्रा

चार धाम यात्रा ही एक धार्मिक यात्रा असून चार पवित्र ठिकाणांचं दर्शन केलं जातं.

Jun 22,2023

यमुनोत्री

हे उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात वसलेलं हे चार धामांपैकी एक आहे. अशी मान्यता आहे कीयमुना नदीचा उगम इथल्या कालिंदी पर्वतामध्ये झाला होता

गंगोत्री

उत्तराखंडमधील उत्तराकशी जिल्ह्यात हे पवित्र ठिकाण आहे. हिंदू मान्यतेप्रमाणे हे गंगा नदीचं उगमस्थान आहे

केदारनाथ

हे धाम उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात वसलेलं आहे. येथे जाण्यासाठी नैसर्गिक सुंदरतेने नटलेल्या पर्वतांमधून, गवताळ प्रदेशातून जावं लागतं

बद्रीनाथ

उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात बद्रीनाथाचं भव्य मंदिर आहे.

यात्रेची सुरुवात

धार्मिक चारधाम यात्रेची सुरवात यमुना नदीत स्नान करून करतात.

अशी असते यात्रा

भाविक गंगोत्रीला जातात त्यानंतर केदारनाथ आणि सरते शेवटी बद्रीनाथ इथं दर्शन घेतात

हिंदू धर्मात पवित्र

हिंदू धर्मात ही यात्रा पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानली जाते.

अविस्मरणीय अनुभव

ही यात्रा कठिण असली तरी भाविकांना अेक अविस्मरणीय अनुभव देऊन जाते.

भाग्यवान भाविक

भाविक मनोभावे या यात्रेत सामील होता. या यात्रेत सहभागी झालेले भाविक भाग्यवान समजले जातात.

VIEW ALL

Read Next Story