प्रवास किंवा तत्सम कैक कारणांनी घराबाहेर पडणं आलं की अनेक मंडळी हॉटेलांमध्ये मुक्काम करतात. जगभरात अशी कोट्यवधी हॉटेलं आहेत जिथं मुक्कामाची सोय असते.
भारतात अनेक हॉटेलांवर OYO असं मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं असतं.
फार स्वस्त दरात OYO हॉटेलमध्ये रुम मिळून जातात म्हणून अनेकजण प्रवासादरम्यान अशा रुमना प्राधान्य देतात. ही देशातील सर्वात मोठी हॉटेल चेन आहे.
ओयो हॉटेल्सचा उल्लेख कितीही सातत्यानं होत असला तरीही याचा नेमका अर्थ मात्र अनेकांनाच ठाऊक नाही.
OYO चा फुलफॉर्म आहे, On Your Own. याआधी या शब्दाचा फुलफॉर्म होता Overall.
2013 मध्ये रितेश अग्रवाल यांनी ओयो नावाच्या या कंपनीची सुरुवात केली आणि फार कमी काळातच या कंपनीला यश लाभलं.