लग्न म्हणजे भारतात एक प्रकारचा उत्सवच असतो. हल्ली भारतात लग्नाचा ट्रेंड खूप बदलत चाललाय.
एका दिवसात उरकणारं लग्न आता दोन दिवस मोठ्या धुमधडाक्यात होतात. त्यामुळे लग्नासाठी किमान खर्च 7 ते 10 लाख रुपये येतो.
लग्नाचा खर्च म्हणजे आर्थिक ताण, लग्नात पैश्यांचं योग्य नियोजन देखील तितकंच गरजेचं असतं.
मात्र, सध्या वेडिंग इन्शुरन्स ही संकल्पना भारतात ट्रेंडिंगमध्ये असल्याचं दिसून येतंय.
वेडिंग इन्शुरन्स म्हणजे नक्की काय असतं? तुम्हाला त्याचा फायदा काय होतो? जाणून घ्या
वेडिंग इन्शुरन्स हा अपघाती विमा आहे. या विम्याअंतर्गत, लग्नाच्या दिवसाशी संबंधित आर्थिक नुकसान कव्हर केलं जाऊ शकतं.
जर लग्न रद्द झालं किंवा इतर नुकसान झाल्यास अतिरिक्त खर्चाची भरपाई या विम्यातून केली जाऊ शकते.
लग्न कोणत्याही कारणाने रद्द झालं किंवा पुढं ढकललं गेलं, तर ते या विम्याअंतर्गत संरक्षित केलं जाऊ शकतं.
लग्न समारंभात इतरांना दुखापत झाल्यास किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्यास या विम्याद्वारे तुम्हाला भरपाई मिळते.