एटीएममधून पैसे काढताना खोटी नोट निघाली तर सर्वप्रथम त्याचा फोटो काढा.
यानंतर एटीएमच्या सीसीटीव्हीसमोर ती नोट दोन्ही बाजुने दाखवा.
अशावेळी तुम्ही एटीएममधूनच निघाला आहात, हे स्पष्ट होईल.
एटीएममधून बाहेर येताना रिसिप्ट संभाळून ठेवा.
यानंतर तुमच्या बॅंकेत जा आणि त्यांना सर्व नीट समजावून सांगा.
यानंतर एक फॉर्म भरावा लागेल. सोबत रिसिप्ट आणि नकली नोट बॅंकेत सबमिट करा.
यानंतर बॅंक नकली नोटा तपासेल आणि तुम्हाला असली नोट देईल.
तुम्ही जास्त रक्कम काढली असेल तर रिसिप्टसोबत नोटदेखील बॅंकेला द्यावी लागेल.
यानंतर बॅंक तपास करेल आणि योग्य नोट तुम्हाला परत करेल.