भारताची राजधानी दिल्लीत जाण्याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.
जर तुम्ही दिल्लीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच ऐतिहासिक स्थळांना भेट द्या. यात लाल किल्ला, इंडिया गेट, हुमायूं का मकबरा अशी अनेक स्थळ आहेत.
दिल्लीत जामा मस्जिद, अक्षरधाम, बंगला साहेब गुरुद्वारा, कैथलिक चर्च, जैन मंदिर आणि निजामुद्दीन दरगाह देखील आहे.
दिल्लीत गेल्यानंतर तिथलं स्ट्रीट फूड नाही खाल्ल तर काहीच मज्जा नाही केली. दिल्लीच्या चांदनी चौकवर अनेक भन्नाट पदार्थ तुम्हाला मिळतील. याशिवाय सरोजिनी नगर मार्केट, सेंट्रल मार्केट आणि खान मार्केट या ठिकाणी देखील चांगलं स्ट्रीट फूड तुम्हाला खायला मिळेल.
दिल्लीतील नॅशनल लायब्रेरी, भारतीय संग्रहालय आणि गांधी स्मृति संग्रहालय लोकप्रिय आहेत.
दिल्लीत काही सुंदर गार्डन देखील आहेत. दिल्लीत नेहरू पार्क, डियर पार्क आणि लोधी गार्डन असे काही लोकप्रिय गार्डन आहेत.
दिल्लीला गेल्यानंतर काही तासांवर असलेल्या ताजमहालला तुम्ही भेट देऊ शकता. दिल्लीवरून तुम्ही ट्रेन किंवा बसनं प्रवास करत आग्राला पोहचू शकता.
दिल्लीत फिरण्याच्या विचारात असाल तर सगळ्यात चांगला सोर्स हा दिल्ली मेट्रो आहे.
दिल्लीत फिरायचा विचार करत असाल तर सनग्लासेस आणि पाण्याची बाटली तुमच्यासोबत ठेवा. (All Photo Credit : Pexels)