नाइट फ्रँक इंडिया 2024 च्या अहवालानुसार भारतातील धनाढ्य व्यक्ती त्यांच्या कमाईचा 17 टक्के भाग लक्झरी अर्थाक आलिशान गोष्टींवर खर्च करतात.
भारतातील एक मोठा श्रीमंत वर्ग लक्झरी घड्याळांवर खर्च करतो.
जगविख्यात कलाकारांनी रेखाटलेली चित्र खरेदी करण्याकडेही या श्रीमंत वर्गाचा कल आहे.
श्रीमंत वर्गाची आणखी एक आवड म्हणजे, हिरे - माणकांचं कलेक्शन करणं.
गतकाळातील लक्झरी कार खरेदी करत ती जपणं आणि मिरवणं हासुद्धा या श्रीमंत वर्गाचा आवडता छंद.
महागड्या हँडबॅग्स आणि या श्रीमंत वर्गाचं नातं तसं फार जुनं.
एखादी जगविख्यात किंवा एखादी दुर्मिळ व्हिस्कीही कलेक्शनमध्ये ठेवण्याकडे या वर्गाचा कल.
जागतिक स्तरावर नावाजलेलं आणि कलेचा उत्तम नमुना असणारं फर्निचरही या मंडळींच्या विशेष आवडीचं.
भारतातील धनाढ्य मंडळी खर्च करत असणारा आणखी एक विभाग म्हणजे जुनी नाणी आणि चलनं.