अर्नोल्ड डिक्स

या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये अरनॉल्ड डिक्स यांनी मोठी भूमिका बजावली. अरनॉल्ड हे इंटरनॅशनल टनेलिंग आणि अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख आहेत. डिक्स भूमिगत बांधकामाशी संबंधित कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

Nov 29,2023

ख्रिस कूपर

ख्रिस कूपर हे मायक्रो-टनेलिंग तज्ञ आहे. त्यांना या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आपल्या अनुभवाचा उपयोग करून त्यांनी हे बचाव अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

नीरज खैरवाल

नीरज खैरवाल हे उत्तराखंड केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना या मिशनचे नोडल ऑफिसर बनवण्यात आले होते. या बचावकार्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी खैरवाल सर्वतोपरी प्रयत्न करत होते.

सय्यद अता हसनैन

भारतीय सैन्यातून निवृत्त लेफ्टनंट जनरल, सय्यद अता हसनैन हे या मिशनमध्ये NDMA चे प्रमुख होते. या बचावकार्यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची भूमिका होती.

मुन्ना कुरेशी

मुन्ना कुरेशी हा रॅट मायनर्समधील प्रमुख होता. आधुनिक यंत्रे फोल ठरल्यानंतर मुन्ना आणि त्याची टीम कामी आली. ही बचाव मोहीम केवळ रॅट मायनर्समुळे यशस्वी पार पडली.


12 नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटरच्या बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला होता. बोगद्याच्या 60 मीटरचा भाग खचल्याने 41 कामगार अडकले होते.


बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या दोन किलोमीटर भागात हे कामगार अडकले होते. अखेर मंगळवारी 17 दिवसांनी सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आलं आहे. यामध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ, एअरफोर्स यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

VIEW ALL

Read Next Story