सध्या डिजिटल आणि नेट बँकिंगचा जमाना असतानाही कँसल चेकची परंपरा कायम आहे. बँका किंवा विमा कंपन्या ग्राहकांकडून कॅन्सल चेकची मागणी करतात.
जेव्हा तुम्ही बँक किंवा अन्य ठिकाणी कँसल चेक देता तेव्हा त्यावर सही करण्याची गरज नसते. या चेकवर फक्त CANCELLED असं लिहायचं असतं.
चेकवर CANCELLED लिहिताना ते तिरकं लिहायचं असतं. पण बँका CANCELLED चेक का मागतात याचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
कंपन्या किंवा बँका ग्राहकांची खाती पडताळण्यासाठी कँसल चेक मागतात.
कँसल चेक देणं, याचा अर्थ त्या बँकेत तुमचं खातं आहे. तसंच चेकवर बँकेचं खातं क्रमांकही लिहिलेला असतो.
कँसल चेक हा सुरक्षित असतो. त्याच्या आधारे कोणीही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. त्याचा वापर फक्त खातं पडताळणीसाठी केला जातो.
त्यामुळेच जेव्हा एखाद्याला कँसल चेक दिला जातो, तेव्हा त्यावर मधोमध CANCELLED लिहिलं जातं. जेणेकरुन कोणीही चेकचा गैरवापर करणार नाही.
जेव्हा तुम्ही आर्थिक कामं करता, बँकेत कर्ज काढण्यासाठी जाता तेव्हा तिथे CANCELLED चेकची मागणी केली जाते.
कँसल चेक देताना नेहमी निळ्या किंवा काळ्या रंगाचं पेन वापरलं पाहिजे. PF मधून ऑनलाइन पैसे काढण्यासाठीही कँसल चेकची गरज भासते.
कँसल चेकवरही आपल्या बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती असते. त्यामुळे हा चेक कोणाच्याही हातात देऊ नका.